

Latur Crime
sakal
लातूर : सुमारे ५७ लाखांच्या कर्जाची परतफेडता करता येईना. किमान एक कोटीचा विमा (टर्म इन्शुरन्स) कुटुंबाला मिळेल, त्यातून कर्ज फेडले जाईल असा विचार करून त्याने बनाव रचला. हा बनाव एवढा भयानक होता की त्याने कारमध्ये दुसऱ्याला बसवून कार पेटवून दिली आणि स्वतःच मेल्याचे भासविण्यासाठी पळ काढला. पोलिसांनी २४ तासांत तपासाची चक्रे फिरवून हा बनाव उघड केला.