esakal | 'रुग्णांनी निष्कारण रेमडिसिव्हिरची मागणी करु नये'
sakal

बोलून बातमी शोधा

'रुग्णांनी निष्कारण रेमडिसिव्हिरची मागणी करु नये'

'रुग्णांनी निष्कारण रेमडिसिव्हिरची मागणी करु नये'

sakal_logo
By
गणेश पिटेकर

लातूर : लातूर जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत झपाट्याने वाढत आहे. लातूर मधील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात रुग्णासाठी जागा नाही. एक ही बेड रिकामा नाही त्यात भर म्हणून जिल्हाभरातून अत्यवस्थ रुग्ण लातुरात पाठवले जात आहे. गरजू गंभीर रुग्णांनाच रेमडिसिव्हिरचा वापर केला जातो. इतर कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रेमडिसिव्हिरची मागणी करू नये, असे आवाहन आयएएम संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे यांनी केले. कोरोनाचा काळ संपला असे गृहीत धरुन कंपन्यांनी इंजेक्शन रेमडिसिवीर उत्पादन डिसेंबर जानेवारी मध्ये थांबवण्यात आले होते.

मात्र कोरोनाची साथ दुप्पट वेगाने पसरत आहे. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणेच आपल्याला रुग्णांची देखभाल करावी लागते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी गरज नसताना इंजेक्शनची मागणी करु नये आणि इकडून तिकडे पळापळ करु नये. शासनाला या उपचाराचा सल्ला देणारे कोविड टास्क फोर्स आहे. सध्या परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे. पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दोन्ही महाविद्यालयाचे अधिष्ठाता सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत.

इंजेक्शनच्या वापरावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी फक्त आपल्या घरातून बाहेर पडू नये, हात धूत राहणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क बांधणे या गोष्टीचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. आयएमए ही संघटना या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. ही वेळ एकमेकांना दोष देण्यापेक्षा हातात हात घालून काम करण्याची आहे. प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.