esakal | 'रूग्णांच्या मृत्यूस जबाबदार धरून जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा'

बोलून बातमी शोधा

‘त्यांनी’आत्महत्येस हे जबाबदार म्हणत...घेतला गळफास!

'रूग्णांच्या मृत्यूस जबाबदार धरून जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा'

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : तहसिलदारांनी पाठवलेल्या एकतर्फी अहवालावरून येथील उपजिल्हा रूग्णालयातील (Nilanga Sub District Hospital) वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनकर पाटील यांना निलंबित केल्याप्रकरणी तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे व्हेंटीलेटर वापराअभावी आठ दिवसांत सव्वीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी व तहसीलदार असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर (Ashok Patil Nilangekar) यांनी मंगळवारी (ता. चार) सर्वपक्षीय आयोजित पत्रकार परिषदेत केली. बाहेरून औषध आणायला लावल्याच्या कारणावरून वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांना कोणतीही चौकशी न करता तहसीलदारांनी पाठवलेल्या अहवालावरून जिल्हाधिकारी यांनी निलंबीत केले होते.(Latur Political News Take Action Against Collector For Death Of Patients) याबाबत रूग्ण व नातेवाईक यांच्याकडून सदर घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा: बंगालच्या निकालाने भाजपचा ग्राफ लागला उतरणीला : इम्तियाज जलील

निलंबित केल्यानंतर येथील उपजिल्हा रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर न दिल्यामुळे ता.२७ तारखेपासून चार तारखेपर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बाब गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदारांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवत डॉ. पाटील यांचे निलंबन रद्द करून त्यांना परत घ्यावे, अशी मागणी करीत आज सर्वपक्षीय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबन महाराज रेशमे, रिपाई गटाचे प्रदेश सरचिटणीस विलास सुर्यवंशी, ओबीसी नेते प्रा. दयानंद चोपणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी, प्रबुध्द भारत संघाचे प्रा. रोहित बनसोडे उपस्थित होते.

हेही वाचा: अलिकडे ये, मला पलिकडे ने... नदी भरली गंगा

श्री.निलंगेकर यांनी निलंबनाच्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी यांना धारेवर धरत कोणत्या आधारे तडकाफडकी निलंबन केले, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. एक तर तज्ज्ञ डाॅक्टर मिळत नसल्याने डॉक्टरांना किरकोळ कारणावरून निलंबित केले जात आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप करून स्वतः जिल्हाधिकारी यांनी पाहणी करावी व तत्काळ निलंबन मागे घ्यावे. अन्यथा आम्हाला पक्षीय पातळीवर दख्खल घ्यावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.डॉ.भिकाणे म्हणाले की, तहसिलदारांनी त्यांचे वरिष्ठ आधिकारी उपविभागीय आधिकारी येथे असतानाही त्यांना कोणतीही कल्पना न देता मनमानी करत चुकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला आहे. यामुळे अशा अत्यावश्यक सेवा काळात डॉ. पाटील यांना निलंबीत करणे भाग पाडले येथील तज्ञ डॉक्टर निलंबीत केल्यामुळे २७ तारखेपासून आजपर्यंत व्हेंटीलेटरवर ऑपरेट करण्यास तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे सव्वीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रसंगी श्री. सूर्यवंशी म्हणाले की, तहसीलदारांनी अल्पसंख्याक विरोधी ही कारवाई तहसीलदार यांनी कारवाई केली आहे. लिंबन महाराज रेशमे म्हणाले की, अशा संकट काळात रूग्णांना सेवा देण्याची गरज असून चौकशीच्या अधीन राहून हे निलंबन मागे घेण्यासाठी पालकमंत्री व मुख्यमंत्री यांना आपण जिल्हाधिकारी व तहसीलदार यांची तक्रार केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.