

Lawyers Offer Election Form Filling Service For One Lakh Raises Concerns In Chhatrapati Sambhajinagar
Esakal
महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी 19 पानाचा अर्ज भरावा लागतोय आणि त्याला सगळ्या कागदपत्राची जोडणी करावी लागते. म्हणजे उमेदवाराची अख्खी कर्मकुंडली त्या अर्जामध्ये असणार आहे. गेल्या पाच दिवसांपासून अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. जर का अर्ज चुकीचा भरला आणि तो बाद झाला तर निवडणुकीतूनच बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे कोणी रिस्क घ्यायला तयार नाही. त्यासाठी आता तज्ञ व्यक्तीकडूनच उमेदवारी अर्ज भरून घेतला जातोय आणि त्यासाठी तज्ज्ञाकडे नंबर लावावा लागतोय. आणि त्याला तब्बल एक लाख रुपये मोजावे लागतायत.