Leopard Attacksakal
छत्रपती संभाजीनगर
Leopard Attack: बिबट्याकडून चार जनावरे लक्ष्य; गंगापूरच्या संजरपूर, माहुली, नवाबपूर शिवारातील घटना
Gangapur News: गंगापूर तालुक्यातील गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले सुरू आहेत; कालवडी आणि शेळ्या ठार झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वन विभागाने त्वरित कारवाई करून नागरिक व पशुधनाचे रक्षण करावे, अशी मागणी झाली आहे.
कायगाव : गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीचा काठ व परिसरातील गाव शिवारात बिबट्यांची दहशत कायम आहे. नवाबपूर, माहुली आणि संजरपूर शिवारात रविवारी (ता. १७) पहाटे बिबट्यांनी दोन ठिकाणी दोन कालवड आणि एका ठिकाणी दोन शेळ्यांचा फडशा पाडला.