esakal | बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दिड महिन्याच्या बछड्याचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

leopard
बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दीड महिन्याच्या बछड्याचा मृत्यू
sakal_logo
By
संजय जाधव

कन्नड (औरंगाबाद): दीड महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याच मृतदेह शनिवारी (ता.24) सायंकाळी शेतात आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बनशेंद्रा शिवारातील अरुण मोतिंगे यांच्या गट क्रमांक 262 मधील मालकी जमिनीत (24 एप्रिल) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दिड महिन्याच्या बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत पडलेला बकरी चारणाऱ्यांना दिसला.

या घटनेबाबत बनशेंद्रा येथील सरपंच यांना माहिती दिली. नंतर सरपंच यांनी घटनेची माहिती वनपाल प्रविण कोळी यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वनपाल प्रविण कोळी, वनरक्षक एम. ए. शेख , सह वनसेवक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व सदर मृत बछड्यास मक्रणपूर रोपवाटिकेत आण्यात आले.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये मद्य विक्रेत्यांचा धुमाकूळ; होम डिलेव्हरी ऐवजी थेट विक्री

नर बिबट्याने हल्ला केल्याने बछड्याचा मृत्यू झाला असावा असे वन अधिकारी यांनी सांगितले. रविवारी(ता.25)सकाळी साहाय्यक वनसंरक्षक सचिन शिंदे, मानद वन्यजीव रक्षक किशोर पाठक, कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी आप्पासाहेब पेहरकर, नागद वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके मानद यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय इटावले, डॉ. डी. आर. चव्हाण यांनी या मृत बछड्याची तपासणी केली. मक्रणपूर रोपवाटिकेत त्या मृत बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.