esakal | बोधीवृक्ष लावू या... जगाला कोरोनापासून वाचवू या
sakal

बोलून बातमी शोधा

बोधीवृक्ष लावू या... जगाला कोरोनापासून वाचवू या

पाच हजार वर्षांपासून ते आजपर्यंत पर्यावरणाचे महत्व सांगूनही आपण समजलो नाही म्हणून आज स्वच्छ पाणी व शुध्द प्राणवायूसाठी आपण तडफडतोय.

बोधीवृक्ष लावू या... जगाला कोरोनापासून वाचवू या

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : कोरोनापासून (Corona) वाचायचं अन् वाचवायचे असेल तर रोगप्रतिकार शक्ती चांगली पाहिजे. त्यासाठी वातावरण व चांगल्या वातावरणासाठी पर्यावरण राखणे आवश्यक आहे आणि चांगल्या पर्यावरणासाठी सर्वाधिक ऑक्सिजन देणारी भरपूर झाडे असावी लागतात. म्हणूनच बुद्ध पौर्णिमेच्या (Buddha Purnima) निमित्ताने शंभर टक्के ऑक्सिजन देणाऱ्या बोधीवृक्षाची (Bodhi Tree) लागवड करा, असा संदेश देत बोधिमित्र राजेश भोसले पाटील यांची अहोरात्र धडपड सुरु आहे. पाच हजार वर्षांपासून ते आजपर्यंत पर्यावरणाचे महत्व सांगूनही आपण समजलो नाही म्हणून आज स्वच्छ पाणी व शुध्द प्राणवायूसाठी (Oxygen) आपण तडफडतोय. कोरोनाच्या महामारीत (Corona Pandemic) तर प्राणवायू विकतही मिळेनासा झाला आहे. जागतिक सर्वेक्षणात कोरोनापेक्षा जास्त मृत्यू प्रदूषणामुळे होत असल्याचे सिद्ध झालेले आहे. तरी आपण अजूनही समस्येच्या मुळावर घाव घालत नाही, असे राजेश भोसले पाटील यांचे म्हणणे आहे. त्यांनी गेल्या पंचवीस वर्षात ७० ते ८० हजार झाडे वाटप केली आहेत. तर १५ ते २० हजार झाडांची प्रत्यक्ष लागवड केली आहे. त्यांनी माळरानावर स्वतंत्र बोधीवन तयार केले आहे. (Lets Plant Boddhi Tree For World)

हेही वाचा: पीएचडी करून आता आंबे विकतो, तरुणाने संभाजीराजेंसमोर मांडली व्यथा

पर्यावरण की महिमा को समझ ना पाया...

धर्म ने सिखाया, बुध्द ने निभाया, तुका ने सुनाया, शिवाने जताया, बाबाने (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) लिखाया फिर भी मैं स्वार्थी, पर्यावरण की महिमा को समझ न पाया. इसीलिये शायद मैं आज साफ पानी और शुध्द ऑक्सीजन के लिए तरसता नजर आया...

- धर्म ने सिखाया : प्रत्येक धर्माची शिकवण पर्यावरण वाचवणे हीच आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात जेवढे धर्म, पंथ, संप्रदाय आहेत त्यांच्या धर्म ग्रंथात निसर्ग व पर्यावरणाच्या महिमेचे महत्व वर्णन केले आहे.

- बुध्द ने निभाया : तथागत भगवान गौतम बुध्द असे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांच्या जिवनात जन्म, आत्मज्ञान आणि महापरिनिर्वाण तीनही बाबी बोधीवृक्षाखालीच झाल्या. त्यांनी अडिच हजार वर्षापूर्वीच पर्यावरणाचे अर्थात पिंपळ वृक्षाचे महत्व विषद केले.

- तुका ने सुनाया : संत तुकारामांनी व सर्वच संतानी आपल्या अभंगातून, वाणीतून सांगितले की वृक्षवल्ली आम्हा सोयरे...

- शिवा ने जताया : छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेचारशे वर्षांपूर्वी अध्यादेश काढून जनतेला पर्यावरणाचे महत्व सांगितले होते.

- बाबाने लिखाया : भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटनेतच पर्यावरण सरंक्षणाचे कलम लिहून ठेवले आहे.

आज प्रत्येक माणसामागे किमान वीस झाडांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात तीन माणसांमागे एक झाड अशी महाभयंकर परिस्थिती आहे. झाडे तोडल्यामुळे अनेक पशु-पक्षांच्या जाती झपाट्याने नष्ट होत आहेत व नको ते विषाणू-जिवाणू जन्म घेत आहेत. मला जगण्यासाठी प्राणवायू आवश्यक आहे. तो निर्माण करणे, टिकवणे यासाठी पुढच्या पिढीला स्वच्छ, सुंदर पर्यावरण देणे आपले कर्तव्य आहे.

-प्रा. राजेश भोसले पाटील, बोधिमित्र, पर्यावरण अभ्यासक