esakal | पीएचडी करून आता आंबे विकतो, तरुणाने संभाजीराजेंसमोर मांडली व्यथा
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - तरुणाने मांडली संभाजीराजेंसमोर व्यथा.

सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी मराठा समाजातील काही लोकांशी संवाद साधला, त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले.

पीएचडी करून आता आंबे विकतो, तरुणाने संभाजीराजेंसमोर मांडली व्यथा

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : वडिलांचा दुध विक्रीचा स्टॉल व हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. आता वनस्पती शास्त्रात पीएचडी पूर्ण केली आहे. मात्र आरक्षण नसल्याने सध्या आंबे विकत आहे. आरक्षण मिळाले असते, तर नोकरी मिळाली असती, अशी व्यथा भारतभूषण पंडित या तरुणांने बुधवारी (ता.२६) खासदार संभाजीराजे यांच्या समोर मांडली. मराठा आरक्षणानंतर (Maratha Reservation) राज्यात वेगवेगळ्या भागात फिरून समाजाची भूमिका जाणून घेण्यासाठी ते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यानिमित्त बुधवारी संभाजीराजे (MP Sambhajiraje) औरंगाबादला (Aurangabad) आले होते. सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी मराठा समाजातील काही लोकांशी संवाद साधला, त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यानंतर ते नाशिककडे रवाना होण्यापूर्वी भारतभूषण पंडित या तरुणाने संभाजीराजे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. (Youth Express His Difficult Condition Before Sambhajiraje)

हेही वाचा: मराठा आरक्षणावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते बोलत नाहीत- संभाजीराजे

भारतभुषण म्हणाला की, आरक्षणची भूमिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मांडण्यात सरकार अपयशी ठरले आहे. म्हणून आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे समाजाची मोठे नुकसान झाले आहे. माझ्यासारख्या अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून त्यांच्यावर आंबे व फळे विकण्याची वेळ आल्याची संतप्त भावना त्याने व्यक्त केली. आरक्षणाविषयी तुमची भुमिका स्पष्ट करा, किमान आरक्षण मिळणार की नाही हे स्पष्ट तरी होईल. आरक्षणाच्या आशेवरती किती दिवस जगायचे असाही प्रश्‍न उपस्थित केला. आंबे विक्री करीत असल्याचे ऐकून खासदार संभाजीराजेही भावूक झाले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश वेताळ पाटील, मनोज गायके पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.