esakal | अल्पवयीन मेहुणीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्या दाजीला जन्मठेप
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad crime

आरोपीने तिला २ ऑक्‍टोबर २०१९ रोजी दुचाकीवर पळवून नेले. त्‍यानंतर तिला विविध ठिकाणी नेत तिच्‍यावर वेळोवेळी अत्याचार केला. चाळीसगाव जवळील एका मंदीरात आरोपीने पीडितेला कुंकू लावत तिला मंगळसूत्र बांधले...

अल्पवयीन मेहुणीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्या दाजीला जन्मठेप

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: अल्पवयीन मेहुणीला प्रेमाच्‍या जाळ्यात ओढत तिला पळवून नेले आणि लग्न लावून वारंवार अत्याचार केल्‍याप्रकरणी ‘दाजी’ला जन्‍मठेप व विविध कलमांखाली ३० हजारांचा दंड ठोठाविण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के. आर. चौधरी यांनी दिले. विशेष म्हणजे गुन्‍ह्यात पीडितेला जेव्‍हा पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तेव्‍हा ती गर्भवती होती. पीडिता व तिच्‍या आई-वडीलांच्‍या संमतीने तिचा गर्भपात करण्‍यात आला. या प्रकरणात १५ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली. त्‍यानुसार, २ ऑक्‍टोबर २०१९ रोजी पीडिता आरोपी सोबत पळून गेल्यानंतर फिर्यादीने पिशोर पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरुन पीडिता हरविल्याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

तपास सुरु असताना पोलिसांनी आरोपी पीडितेला आरोपीच्‍या नातेवाईकाच्‍या घरातून ताब्यात घेतले होते. त्‍यावेळी पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला. घटना घडण्‍यापूर्वी सात-आठ वर्षांपूर्वी पीडितेच्‍या मोठ्या बहिणीचे लग्न आरोपीशी झाले. आरोपी हा पीडितेच्‍या घरी नेहमी येत जात होता. त्‍यातच त्‍यांची जवळीक निर्माण होऊन त्‍यांचे एकमेकावर प्रेम जडले. घटना घडण्‍यापूर्वीच्‍या दोन महिन्‍यांपूर्वी पीडितेची बहीण बाळंतपणासाठी माहेरी आली होती. त्‍यावेळी आरोपी देखील तिच्‍यासोबत आला. तो महिनाभर तेथे राहिला. दरम्यान घरी कोणी नसल्याची संधी साधत आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केला.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या आरोपानंतर खासदारांनी घेतली थेट उद्योगमंत्र्यांची भेट

...तिला नेले पळवून-
पीडितेला दोन महिन्‍यांपासून मासिक पाळी न आल्याने ही बाब पिडीतेने आरोपीला सांगितली. आरोपीने तिला २ ऑक्‍टोबर २०१९ रोजी दुचाकीवर पळवून नेले. त्‍यानंतर तिला विविध ठिकाणी नेत तिच्‍यावर वेळोवेळी अत्याचार केला. चाळीसगाव जवळील एका मंदीरात आरोपीने पीडितेला कुंकू लावत तिला मंगळसूत्र बांधले. आरोपी हा पीडितेला घेवून एका नातेवाईकाच्‍या घरी थांबला होता. दरम्यान तो गावात असल्याची माहिती मिळाताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

डीएनए नमुना ठरला महत्त्वाचा-
पोसिलांनी पीडितेच्‍या जबाबा नंतर पीडितेचा घेतलेला डीएनए नमुना आरोपीशी जुळून आला. त्‍यांनतर पीडिता व पीडितेच्‍या पालकांच्‍या संमत्तीने पीडितेचा गर्भपात करण्‍यात आला. खटल्याच्या सुनावणीवेळी विशेष सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात पीडिता आणि न्‍यायवैद्यकिय प्रयोग शाळेचा डीएनए अहवाल महत्वाचा ठरला. सुनावनीअंती न्यायालयाने आरोपी भादंवी कलम ३७६ (२) अन्‍वये जन्‍मठेप आणि २० हजारांचा दंड, तर कलम ३६६ अन्‍वये १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजाररुपयांचा दंड ठोठावला. खटल्‍यात अॅड. शिरसाठ यांना अॅड. तेजस्‍वीनी जाधव यांनी सहाय केले. तर पैरवी म्हणून सुनील ढेरे, एस.एल. सातदिवे यांनी काम पाहिले.

loading image
go to top