प्रेम प्रकरणाची गावभर चर्चा; तिने फोन करुन काढला प्रियकराचा काटा

प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून; मुलीसह चौघांवर गुन्हा दाखल
Aurangabad Crime News
Aurangabad Crime Newssakal

उमरगा : प्रेम प्रकरणाच्या संबंधावरून संगनमत करून तरुणाचा खून केल्याच्या तक्रारीनुसार तालुक्यातील गुंजोटी येथील मुलीसह, वडील व दोन मामाविरुद्ध शनिवारी (ता.१९) दुपारी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुंजोटी येथील एका खासगी शाळेवर शिक्षक असलेले जावेद सिराज काझी (वय २९) यांचे प्रेमप्रकरण गावातील राणी नागोराव गंजेकर हिच्याशी असल्याच्या चर्चेमुळे राणी नागोराव गंजेकर, वडील नागोराव माणिक गंजेकर, मुलीचे मामा राजेंद्र विठ्ठल दुधभाते, संदीप विठ्ठल दुधभाते चौघांनी संगनमताने शुक्रवारी (ता.१८) रात्रीच्या सुमारास जावेदला घरी बोलावले व मारहाण करून खून केली. अशी तक्रार आहे.

या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता, मृत जावेद काझी व राणी यांचे प्रेम प्रकरण एक-दीड वर्षांपासून सुरू होते. शुक्रवारी रात्री राणीने जावेदला फोन करून घरी बोलावले. यावेळी जावेदचा मित्र निजाम कागजे सोबत होता. जावेद राणीच्या घरी गेला तर निजाम हा शेजारीच असलेल्या संभाजी उद्यानाच्या बाकड्यावर जाऊन बसला. पंधरा मिनिटांनी राणी पळत येऊन निजामला म्हणाली की, तुझ्या मित्राला काहीतरी झाले आहे. तो तडफडत आहे. दोघेही घराकडे गेले असता जावेद घरासमोरील अंगणात पडला होता. नंतर नातेवाइकांना बोलावून घेऊन उमरगा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाला होता. उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथेही जावेद मृत असल्याचे सांगण्यात आले.

पोलिस ठाण्यात गर्दी

जावेदचा घातपात झाल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेतले जाणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. उपजिल्हा रुग्णालयात याबाबत बरीच चर्चा झाली. त्यानंतर ठाण्यात तक्रार घेण्याचे काम सुरू असताना गुंजोटीतील नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. दुपारी दोनला गुन्हा दाखल झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर जावेदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com