

Success Story
sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘शरीराला दिव्यांगत्व आले तरी; मन, स्वप्नं आणि ध्येय कधीही अपंग नसतात. हे दाखवून देणारी सिन्नरची मधुमिता विनायक पुजारी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा बनली आहे. पोलिओमुळे ५९ टक्के दिव्यांगत्व असतानाही तिने आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने झेप घेतली आहे.