
औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवणारच - अब्दुल सत्तार
औरंगाबाद : औरंगाबाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी महाराणा प्रताप यांचा पुतळा आणि विमानतळाचे नामांतर यावरुन राजकारण सुरु झाले आहे. कॅनाॅट प्लेस येथे महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवणारच. त्यासाठी पुढाकार घेईन, असा शब्द राज्याचे महसूलमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिला आहे. आज गुरुवारी (ता.२७) सिल्लोड येथील नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सत्तार बोलत होते. ते म्हणाले महाराणा प्रताप यांचा पुतळा औरंगाबादेत बसवणारच. इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी त्याला विरोध करु नये, असे आवाहन केले आहे. (Maharana Pratap Statue Will Be Install In Aurangabad, Says Minister Abdul Sattar)
हेही वाचा: पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचा औरंगाबादेत रात्री फेरफटका,विकासकामांची केली पाहणी
इम्तियाज जलील यांच्या त्या विधानाने वाद
औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेने शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा बसावा यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यासाठी एक कोटी रुपये ही मंजूर झाल्याचे कळते. याला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. त्यांनी पुतळ्या ऐवजी शाळांसाठी पैशाचा उपयोग करावा असे सुचवले आहे. यावरुन माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी जलील यांच्यावर टीका केली होती.
Web Title: Maharana Pratap Statue Will Be Install In Aurangabad Says Minister Abdul Sattar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..