

B Pharmacy
sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘बी फार्मसी’ अभ्यासक्रमाच्या केंद्रिकृत प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीत ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना जागा वाटप सोमवारी (ता. २७) जाहीर झाले. तिन्ही फेऱ्यांनंतरही राज्यभरात एकूण १४ हजार ८९ जागा अद्याप रिक्त आहेत. तिसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान संबंधित संस्थेत हजर राहून प्रवेशाची अंतिम निश्चिती करावी लागणार आहे.