
छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाइन पद्धतीने पार पडत आहे. यावर्षी राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश सर्वप्रथम राबविण्यात येत असून, राज्यातील एकूण ९५३५ कनिष्ठ महाविद्यालयांची एकत्रित प्रवेश क्षमता २१ लाख ५९ हजार २३२ इतकी आहे.