esakal | गृहमंत्रीच आले औरंगाबादेत : कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, आमदार-खासदारांनी मांडले हे प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे शनिवारीच (ता.१८) औरंगाबाद मुक्कामी आले आहेत. त्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री पोलिस अधिकाऱ्यांशी आणि आज सकाळी खासदार-आमदारांसह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

गृहमंत्रीच आले औरंगाबादेत : कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, आमदार-खासदारांनी मांडले हे प्रश्न

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे शनिवारीच (ता.१८) औरंगाबाद मुक्कामी आले आहेत. त्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री पोलिस अधिकाऱ्यांशी आणि आज सकाळी खासदार-आमदारांसह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी बैठकीला सुरवात होण्यापूर्वी खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही थर्मल गनने स्क्रीनिंग करण्यात आले. त्यानंतरच ते सभागृहात गेले. यावेळी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, संजय शिरसाट, प्रशांत बंब, सतीश चव्हाण, विक्रम काळे, अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

त्याचबरोबर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, कारागृह उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांच्यासह सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.  

लोकप्रतिनिधींनी मांडले प्रश्न

यावेळी खासदार, आमदारांनी आपल्या मतदारसंघात या परिस्थितीत उद्भवलेले प्रश्न गृहमंत्र्यांसमोर मांडले. अत्यावश्यक सेवेत सुरू झालेल्या कारखान्यांच्या कामगारांना दुचाकीवर जाण्याची परवानगी द्यावी, बँका आणि राशन दुकानांसमोर होणाऱ्या गर्दीवर उपाय काढावा, मोफत धान्य आणि नियमित रेशनचे एकत्र वाटप करावे, शिक्षणासाठी आलेल्या आणि अडकून पडलेल्या मुलांना घरी जाण्याची व्यवस्था करावी, राजस्थानातल्या कोटा येथे अडकलेल्या मुलांना परत आणावे, रमजान महिन्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशा आणि इतर अनेक प्रश्नांबाबत गृहमंत्र्यांना अवगत करण्यात आले. 

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

पोलिसांकडून घेतला आढावा

काल शहरात आलेल्या गृहमंत्र्यांनी रात्री जिल्हाधिकारी कार्यालय, टिव्ही सेंटर, आझाद चौक, रोशनगेट परिसरात गाडीतून उतरून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी संवाद साधला़. नागरीकांना घरात राहण्याचे आवाहन केले़. यानंतर ते चंपाचौकमार्गे सुभेदारी विश्रामगृह येथे आले. या ठिकाणी त्यांनी रात्री ९़.३० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील परिस्थितीचा पोलीस प्रशासनाकडून आढावा घेतला.

loading image