Solar Pump: पुढील वर्षी दहा लाख सौरपंपांचे लक्ष्य; मुख्यमंत्री फडणवीस, योजनेत महाराष्ट्र ठरला जागतिक विक्रमवीर
CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राने ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत तब्बल सात लाख पंप बसवून देशातील ६५ टक्के वाटा उचलत गिनीज विश्वविक्रम नोंदवला असून पुढील वर्षी दहा लाख पंप बसवण्याचे लक्ष्य आहे.
छत्रपती संभाजीनगर : देशात साडेनऊ लाख सौर कृषीपंप बसले, त्यापैकी सात लाख सौर कृषीपंप एकट्या महाराष्ट्राने बसवून ६५ टक्के वाटा उचलला आहे. एकाच महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सोलर कृषीपंप बसवून महाराष्ट्राने विश्वविक्रम केला.