औरंगाबाद : दहावीच्या निकालात यशाची परंपरा

अनेक शाळांचे निकाल शंभर टक्के : ओंकार, पी.यू.जैन, विश्वात्मा, एलोराचा समावेश
ssc exam result
ssc exam resultsakal

औरंगाबाद : दहावीच्या निकालात शहरातील शाळांनी घवघवीत यश संपादन केले. अनेक शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली

ओंकार विद्यालय

ओंकार विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पार्थ चाटूपळे (९७.८०), अमोदिनी घाडगे (९६.६), मिहीर खेर्डेकर (९३) टक्के मिळवून अनुक्रमे क्रमांक पटकावले. मराठी विषयात ९ विद्यार्थ्‍यांनी ९५, संस्कृत विषयात ३ विद्यार्थ्यांनी १०० गुण मिळविले.

पी.यु. जैन विद्यालय

राजाबजार येथील पी यु जैन माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के निकाल लागला. विद्यालयातून अनुष्का काजळे (९३), तेजस्विनी आडणे (९१), कुलदीप पवार (९०) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. संस्थेचे अध्यक्ष महावीर सेठी, सचिव आशादेवी काला, सुनील सेठी, प्रकाशचंद कासलीवाल, मुख्याध्यापक विजय पाटोदी व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळाची शंभर टक्‍क्यांची परंपरा

विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित, कौशल्या विद्या मंदिर पाटेगाव (ता. पैठण), वंदे मातरम् विद्यालय पुंडलिकनगर आणि नालेगाव (ता.वैजापूर )भागीरथी माध्यमिक विद्यालय या तीनही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कौशल्या विद्या मंदिर शाळेतून सुदर्शन नाटकर (९८.२०), क्षितीज अकोलकर(९६.८०), सिद्धी रावस (९४.८०) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. संस्थाध्यक्ष प्रा. चंद्रकांत गायकवाड, सचिव वाल्मिक सुरासे, मुख्याध्यापक निलेश गायकवाड, शिक्षक विजय सपकाळ, नंदकिशोर पातकळ, बालाजी नलभे, सोन्याबापु पालवे, आकेश दांडेकर, प्रवीण काळे, नारायण औटे, अमोल गायकवाड, प्रकाश कामडी, भाऊसाहेब गायकवाड आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

एलोरा इंग्रजी स्कूल

बीड बायपास वरील एलोरा इंग्रजी हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतील ७५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून पूर्वा लाड (९५), ग्रिषिमा वेताळ( ९४.६०), किर्ती देशमुख (९४.६०), भूमिका चव्हाण (९४.६०), कूणाल पवार (९४.२०), गुरखे सर्वेश (९४.२०), वैष्णवी सोमवंशी (९३.४०), सुमित तलकरी (९३.२०), निरंजन खैरनार (९०.२०), खुशी प्रसाद (९०.२०), गायत्री गोजे (८९.८०), विश्वजीत लोडवाल (८९.६०), प्रतिक्षा जांभळे (८८.६०) यांनी निकालात बाजी मारली. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता शिंदे-भापकर, प्रल्हाद शिंदे व सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ज्ञानेश विद्यामंदिर

ज्ञानेश विद्यामंदिर शाळेचा निकाल ९८ टक्के लागला. शाळेतील १७६ पैकी १७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये स्नेहल सुर्यवंशी, करिष्मा राजभर या विद्यार्थिनींनी १०० पैकी १०० ; तर चैतन्य वाघ याने ९८ टक्के गुण मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी शिक्षकांनी घोड्याच्या रथातून मिरवणूक काढली. स्नेहलचे वडील सुतार काम; तर आई गृहिणी आहे. करिष्माचे एका कंपनीत कामगार म्हणून कार्यरत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव मीनाक्षी विटोरे, पूजा पऱ्हे, अध्यक्ष शैलेंद्र विटोरे, रजनी परमेश्वर, मुख्याध्यापक रामनाथ पंडूरे, संजीवनी आरदवाड, पुष्पा लोखंडे आदींनी अभिनंदन केले.

वंडर गार्टन स्कूल

न्यू विशालनगर येथील वंडर गार्टन स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयातून संकेत मगर (९६.४०), रसिका साळकर (९५.६०), विशाल इंदापूरे (९४.२०), अनंत जोशी (९२.६०), वरद चांडक (९२.६०), प्रथमेश खडके (९२.६०), अभिषेक निकम (९२.४०) यांनी अनुक्रमे यश मिळविले. शाळेचे अध्यक्ष गणेश पालवे, मुख्याध्यापिका पी.डी. सावजी, पर्यवेक्षक पी.एस. पाटील व सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मॉरल किड्स हायस्कूल

मॉरल किड्स हायस्कूल मराठी व इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयातून प्रांजल श्रीकांत (९६.२०), भावना राठोड(९६), शिवानी कापसे (९४.८०) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष जैस्वाल, संदीप जैस्वाल, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

श्री सरस्वती भुवन प्रशाला सरस्वती भुवन प्रशालेचा दहावीचा निकाल ९६.६५ टक्के लागला. यामध्ये ओजस परदेशी ९९.२, हर्ष कांबळे ९६.४, कार्तिक सोनवणे ९६.२ टक्के यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. शालेय समितीचे अध्यक्ष प्रमोद माने, मुख्याध्यापक एम. ई. पाटील, डी एम. येवले, संजय परदेशी, डी. आर. बैरागीसह शिक्षकवृंद यांनी आभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com