
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) दूरदृष्टीपूर्ण आणि सृजनशील उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ‘महाराष्ट्र पर्यटनदृष्टी २०४७, नव्या संधी!’ या संकल्पनेखाली पर्यटन क्षेत्राचा व्यापक, सर्वसमावेशक आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांची मते अजमावली जाणार आहेत.