esakal | Mahashivratri २०२० : या बाराव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही यात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

खुलताबादपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या पायथ्याशी श्रीघृष्णेश्वराचे मंदिर आहे. खुलताबाद येथून नागमोडी वळण घेत जाणारा रस्ता थेट आपल्याला घृष्णेश्वर मंदिराजवळ पोचवितो. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

Mahashivratri २०२० : या बाराव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही यात्रा

sakal_logo
By
देवदत्त कोठारे

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : खुलताबाद तालुक्याचा ऐतिहासिक पर्यटन वारसा पाहता, या तालुक्याला धार्मिक वारसाही लाभलेला आहे तो वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरामुळे. अकरा ज्योतिर्लिंगांचे दर्शन केल्यानंतर या बाराव्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले, की ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होते. मनोकामना आणि‍‍ यात्रा पूर्ण करणारे ज्योतिर्लिंग म्हणून याचे अनन्यसाधारण महत्त्व शिवपुराणात आढळते.

खुलताबादपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या पायथ्याशी श्रीघृष्णेश्वराचे मंदिर आहे. खुलताबाद येथून नागमोडी वळण घेत जाणारा रस्ता थेट आपल्याला घृष्णेश्वर मंदिराजवळ पोचवितो. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

हे शेवटचे ज्योतिर्लिंग असून, इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा छोटे व पूर्वाभिमुख आहे. वेरूळ येथील हे मंदिर संपूर्ण लाल पाषाणाच्या दगडात बांधले आहे. या मंदिराचा अर्धा भाग लाल पाषाणात, तर वरील भाग विटा, चुन्यात बांधलेला असून, मंदिराचा कळस गुजरातमधील भाविक जयराम बाबू यांनी बसविल्याचे उल्लेखात आढळते. 

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

या मुख्य मंदिराआधी कोकिळा मंदिर आहे. घृष्णेश्वराच्या मंदिराला तीन दरवाजे असून, ते चोवीस खांबांवर उभे आहेत. या खांबांसह, मंदिराच्या बाह्य भागातही उत्कृष्ट कलाकुसर करण्यात आलेली आहे. घृष्णेश्वर मंदिराचा; तसेच मंदिरापासून जवळच असलेल्या शिवालय तीर्थकुंडाचा जीर्णोद्धार अहल्यादेवी होळकर यांनी केला असल्याचा उल्लेख शिलालेखात आढळतो.

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाबाबत स्कंदपुराण, शिवपुराणात वेगवेगळे संदर्भ आढळतात. या ज्योतिर्लिंगाला कुकुमेश्वर, घुष्णेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराला लागून येळगंगा नदी वाहते; तसेच या ठिकाणी शिवालय तीर्थही असून, या दोन्ही ठिकाणी स्नान करून नंतर दर्शन करण्याची भाविकांमध्ये श्रद्धा आहे. 

महाशिवरात्रीला मोठी यात्रा

वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दर सोमवारबरोबर, श्रावणात मोठी गर्दी असते; तसेच या ठिकाणी सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. महाशिवरात्रीच्या महापर्वकाळात भाविक दर्शनासाठी लखोंच्या संख्येने येतात. 

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

वेरूळ येथे जगप्रसिद्ध वेरूळ लेणीबरोबरच बारावे ज्योतिर्लिंग श्रीघृष्णेश्वर, श्री लक्ष विनायक मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ म्हणून इतिहासाची साक्ष देणारे शहाजीराजे भोसले स्मारक या सर्व ठिकाणी देश-विदेशांतील भाविक, पर्यटक वर्षभर भेट देतात.

त्याच अनुषंगाने वेरूळचा झपाट्याने विकास व्हावा म्हणून पर्यटन प्राधिकरणाअंतर्गत लेणीसमोर प्रशस्त वाहनतळ, विविध आयुर्वेदिक फळे असलेल्या झाडांचे गार्डन बनविणे सुरू आहे. मात्र, घृष्णेश्वर मंदिर विकास आराखडा गुलदस्त्यातच आहे, तो प्रशासनाच्या दिरंगाईमुळे.