माजलगाव : टालेवाडीत विजेचा करंट लागल्याने चुलत बहीण भावाचा मृत्यू

वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे घडली घटना
करंट लागल्याने चुलत बहीण भावाचा  मृत्यू
करंट लागल्याने चुलत बहीण भावाचा मृत्यूsakal

माजलगाव: तालुक्यातील टालेवाडी येथे विज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे विजेचा करंट लागल्याने चुलत बहिण भावाचा मृत्यू झाल्याची घटना आज ता,12 दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

तेलगाव रोडवर असलेल्या टालेवाडी येथे गावात करंट उतरत आहे अशा तक्रारी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडे ग्रामस्थांनी अनेक वेळा तोंडी केले आहेत परंतु या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे आखेर आज

ता १२ शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान सार्थक अशोक बडे वय ९ वर्ष हा मुलगा घराच्या पत्र्यावर गेला होता स्लॅब च्या गजा ला धरून वर येत असताना तो थरथर कापू लागला व मोठमोठ्या ने रडू लागला म्हणून तिथे असलेली त्याची ची चुलत बहीण साक्षी भारत बडे वय १२ वर्ष ही त्याच्या मदतीला धावली आणि या दोन्ही चुलत बहीण भावाचा करंट लागून मृत्यू झाला गावात अखंड हरीनाम सप्ताह सुरू असल्याने दुपारी रामायण कथा श्रावणासाठी घरातील लोक गेले होते घरी कुणीही लोकनव्हते परंतु दोघांना ही तात्काळ ग्रामस्थांनी माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आनले होते परंतु सदरील मुलांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे डाँक्टर नी सांगितले या घटनेमुळे गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com