esakal | सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर अपघात, एक जण गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली जिल्ह्यात मकोडीजवळ अपघात

सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर अपघात, एक जण गंभीर जखमी

sakal_logo
By
मुनाफ शेख

आडुळ (जि.औरंगाबाद) : बकरी ईद सणासाठी (Bakari Eid) सासरहुन बहिणीला माहेरी घेऊन येत असलेल्या भावाची दुचाकी औरंगाबाद (Aurangabad) - सोलापुर (Solapur) राष्ट्रीय महामार्गावरील रजापुर (ता.पैठण) शिवारात घसरल्याने झालेल्या अपघातात भाऊ गंभीर जखमी, तर बहिण आणि त्याचा भाचा किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.१९) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. असमा फारुख पठाण (वय ३०, रा. बिडकिन, ता.पैठण) (Paithan) या विवाहितेचे अंबड येथे माहेर आहे. तिला बिडकिन येथून बकरी ईद सणासाठी अंबड येथे आणण्यासाठी तिचा भाऊ अरबाज रफिक शेख हा गेला होता. तो आज बहीण असमा व तिचा मुलगा दानिश यांना दुचाकीने (एमएच २१ बीजे ५९८०) बिडकिन येथून घेऊन येत असताना दुचाकी रजापुर शिवारात येताच अचानक घसरल्याने दुचाकी स्वार तिघे जण खाली पडले. (man died in accident at solapur aurangabad highway paithan glp 88)

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

यात दुचाकीचा चुराडा होऊन अरबाज शेख गंभीर, तर त्याची बहीण असमा पठाण व भाचा दानिश हे किरकोळ जखमी झाले. जखमींना सुदर्शन गिते, बाळु गिते, शेख आजीज, आरेफ शेख यांनी मदतकार्य केले. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. असलम सय्यद, चालक रईस शेख यांनी पुढील उपचारासाठी हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रविंद्र क्षीरसागर, विश्वजित धन्वे करीत आहेत.

loading image