Sambhaji Nagar : वैजापुरात ४४ दुकानांना ठोकले टाळे

व्यावसायिकांत खळबळ : भाडेतत्त्वावरील नियमांचे उल्लंघन भोवले
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

वैजापूर : शहरात वसंत क्लब या नोंदणीकृत संस्थेने ४४ व्यवसायिकांना भाडेतत्त्वावर दिलेल्या भूखंडांवरील दुकानांना उपविभागीय अधिकारी यांनी रविवारी सायंकाळी कुलूप लावण्याची धडक कारवाई सुरु केल्याने शहरातील व्यावसयिकांत खळबळ उडाली आहे.

धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी असलेल्या या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.जऱ्हाड यांनी संस्थेचे कामकाज आणि उत्पन्नाचे साधने तपासणी दरम्यान त्यांना व्यवसाय करण्यासाठी संस्थेच्या अखत्यारीत भूखंड अंत्यत कमी दराने दिले असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारावर त्यांनी दुकाने सील करण्याची भूमिका घेतली. दरम्यान, संस्थेकडून भाडेपट्ट्यावर मिळालेली जागा व्यावसयिकांनी परस्पर दुसऱ्या व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांची अनामत रक्कम स्वीकारून १० ते १५ हजार रुपये प्रति महिना भाडे वसूल करीत असल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी त्यांनी याठिकाणी भेटी दरम्यान उघड झाली होती. सुधारित भाडे शुल्क निश्चित करण्यासाठी त्यांनी ही कारवाई केली.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निजाम राजवटीत त्यांच्या प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी या विरंगुळा केंद्राची स्थापना करण्यात आली होती. निजाम राजवटीचा अस्त झाल्यानंतर कामकाज चालविण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे अधिकृत नोंदणी असलेल्या या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्य संख्येचे विश्वस्त मंडळ नियुक्त केले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात संस्थेचे भूखंड व्यावसायिकांना नाममात्र शुल्कावर भाडेतत्त्वावर दिली आहे.

मात्र, या व्यावसायिकांनी वसंत क्लब या संस्थेची कोणतीही परवानगी घेतली नाही. दुसऱ्या व्यक्तींना ही जागा प्रति महिना दहा ते पंधरा हजार रुपये याप्रमाणे व्यवसायासाठी दिल्याचा प्रकार संस्थेचे अध्यक्ष डॉ. जऱ्हाड यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी बाजार भावाप्रमाणे संस्थेला जागा भाडे आकारणी करण्यासाठी

दुकाने सील करण्याची कारवाई केली.

प्रत्येक दालनात सीसीटीव्ही

वसंत कल्बचे अध्यक्ष डॉ.अरुण जऱ्हाड यांनी या विरंगुळा केंद्रात सायंकाळपासून ते रात्री उशिरा पर्यत होणाऱ्या घडामोडीवर बारकाईने देखरेख ठेवण्यासाठी इमारतीच्या प्रत्येक दालनात सीसीटीव्ही लावण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.

रविवारी शहरातील ४४ दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. दुकानांचे भूखंड हे वसंत क्लबच्या मालकीची आहे. परंतु दुकानांचे भूखंडामध्ये अवैध प्रकारे व्यवहार झाल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली.

- डॉ.अरुण जऱ्हाड, उपविभागीय अधिकारी, वैजापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com