
नवनाथ इधाटे, उस्मान पठाण
फुलंब्री : मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान समाज बांधवांची झालेली दैयनिय अवस्था पाहून तालुक्यातील आळंद येथे संतप्त नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन रविवारी (ता.३१) सकाळी साडेनऊ वाजता केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वडोद बाजार पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.