Maratha Reservation : 'आज आम्ही लटकलो उद्या सरकारला लटकवू', सिल्लोडमधील आंदोलनात तरुण आक्रमक

Maratha Reservation sillod andolan
Maratha Reservation sillod andolan sakal

Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील मंगरुळ फाट्यालगत सकल मराठा समाजाच्या तरुण बांधवांनी मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी झाडाला उलटे लटकून आंदोलन केले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करीत झाडाला उलटे लटकून घेतले. आंदोलकांच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले.

Maratha Reservation sillod andolan
Maratha Reservation : कोर्टात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल : सूरज चव्हाण

निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, अंतरवाली सराटी येथे आंदोलन करते मराठा बांधवांवर दाखल खोटे गुन्हे तात्काळ रद्द करावे. यावेळी राज्य सरकारला मराठा आरक्षण तात्काळ लागू करा अन्यथा आम्ही आज झाडाला लटकलो उद्या सरकारला लटकवू,

Maratha Reservation sillod andolan
Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट आरक्षण दिल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात? बैठकीत अधिकाऱ्यांनी मांडली मतं

मराठा समाजाकरता मागील बारा दिवसापासून उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल. मराठा समाज शांततेने आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा अंत पाहू नका. अन्यथा उद्रेक होईल असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

Maratha Reservation sillod andolan
Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणी कपातीचं टेन्शन होणार दूर; जाणून घ्या काय आहे तलावांची स्थिती?

यावेळी मारुती वराडे, प्रवीण मिरकर, शिवाजी दाभाडे, प्रमोद दौड, प्रमोद शिंदे, अनिल बनकर, राजू बर्डे, आशिष गोराडे, दत्ता पांढरे, पंकज गोराडे, सोमनाथ राऊत, अक्षय मगर, सुखदेव भगत, अक्षय पाटील, अजय कोलते, डॉ.निलेश मिरकर, डॉ.शेखर दौड, डॉ. विशाल अकाते, मयूर क्षीरसागर, विशाल सोनवणे, युवराज वराडे, रविंद्र दौड, गजानन दौड, भारत दौड यांचेसह सकल मराठा समाजाचे समाज बांधवांची उपस्थिती होती.

यावेळी नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे, पेशकार शिवाजी सोनवणे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com