Maratha Reservation : बीडच्या तडाख्यात संभाजीनगरच्या बस; तोडफोडीमुळे एसटीला दीड कोटी रुपयांचा तोटा

बसेस बंद असल्याने प्रवाशांचे हाल सुरुच आहे. अनेकांना जाण्यासाठी खासगी गाड्यांशिवाय पर्याय नाही.
maratha reservation sambhaji nagar bus damage maratha protesters 1 5 cr loss msrtc
maratha reservation sambhaji nagar bus damage maratha protesters 1 5 cr loss msrtcSakal

छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये ५७ बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगरच्या दहा बसेसचा समावेश आहे. यात जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले. बीडमध्ये एसटी बससेची तोडफोड केल्यानंतर खबरदारीचा उपाय करीत छत्रपती संभाजीनगर विभागाने बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला.

तीन दिवसांपासून जिल्हाभरातील आठही आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. तीन दिवसांपासून एसटी बसेस बंद असल्यामुळे महामंडळाला दीड कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली.

एक लाख ९० हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द

छत्रपती संभाजीनगर विभागातून नांदेड, लातूर, धाराशीव, अंबाजोगाई, बीड, शिर्डी, पुणे, मुंबई, धाराशीव, धुळे, जळगाव, अकोला, वाशिम, नागपूर, जालना अशा मार्गावर धावणाऱ्या बसेस सलग तीन दिवसांपासून आगारात उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. एक लाख ९० हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

विभागात ४५० एसटी बस गाड्यांची संख्या आहेत. या सर्व बसेस दररोज प्रवाशांना सेवा देण्यासाठी दिवस रात्र रस्त्यावर धावतात. मात्र गेल्या तीन दिवसापासून या सर्व बसेस जिल्हयातील आठही आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत. उभ्या करण्यात आलेल्या एसटी बसेस दररोज प्रवाशांना घेऊन धावल्या तर त्यापोटी दररोज एसटी महामंडळाला ५० लाखांचे उत्पन्न होते.

प्रवाशांचे हाल सुरुच

बसेस बंद असल्याने प्रवाशांचे हाल सुरुच आहे. अनेकांना जाण्यासाठी खासगी गाड्यांशिवाय पर्याय नाही. मध्यवर्ती बसस्थान, सिडको बस्थानक, हर्सुल टी पॉईंट, बाबा पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन या परिसरातून खासगी वाहने प्रवाशांना कोंबून घेऊन जात आहेत. त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com