मराठा मतांचा राजकीय पक्षांनी घेतला धसका; जातीय समीकरणामुळे २०१९ ची परिस्थिती, रिस्क कोण घेणार?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत कुठलाही निर्णय झाला नाही.
Maratha Votes A Challenge for Political Parties in Maharashtra lok sabha election
Maratha Votes A Challenge for Political Parties in Maharashtra lok sabha electionSakal

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. संभाजीनगर लोकसभा धार्मिक आणि विविध जातीय समीकरणांवर आधारलेली आहे. याची प्रचिती २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वांना जाणवली.

आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा आणि ओबीसी असे विरुद्ध समीकरण झाले आहे. याचा धसका राजकीय पक्षांनी घेतला आहे. यामुळे भाजपपासून ते दोन्ही शिवसेना ही जातीय समीकरणाची जुळवाजुळव, आकडेमोड करीत आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने मराठा फॅक्टर खूप प्रभावी होता. तत्कालीन अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी २ लाख ८३ हजार ७९८ मते घेतली होती. दुसरीकडे ओबीसीतील सर्व जातीही एकवटल्या होत्या.

त्यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने उभे मतदान केले होते. आता मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाज एकवटण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी समाजही एकवटलेला दिसतो.

मंत्री छगन भुजबळ यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर आरोप करीत ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध करीत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली. यामुळे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र तयार झाले आहे.

याचाच अभ्यास भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्याकडून केला जात आहे. ज्या समाजाचे जास्त मतदान त्याच समाजाचा उमेदवार देण्याची चर्चा चालू झाली. यातून भाजपचे मराठा समाजातील नेते वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी प्रयत्न करू लागले.

दुसरीकडे ओबीसींची टक्केवारी जास्त असल्याने मराठा समाजाचा उमेदवार दिल्यास २०१९ सारखी परिस्थिती उद्‍भवण्याची शक्यता आहे. लोकसभा मतदारसंघात २० लाख ७ हजार १८४ मतदार आहेत. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांत १० लाख ४० हजार ३४१ मतदार आहेत.

ग्रामीण भागात ९ लाख ६६ हजार ८४३ मतदार आहेत. यात सर्वांत छोटा मतदारसंघ वैजापूरचा, तर सर्वांत मोठा मतदारसंघ पश्‍चिम आहे. लोकसभेचा विचार केल्यास मुस्लिम मतदार हा निम्न शहरात व सेमी अर्बन भागात जास्त आहे, तर गंगापूर-वैजापूर या भागांत माळी, धनगर, परदेशी हा समाज जास्त आहे.

पश्‍चिम मतदारसंघात दलित व मुस्लिमांची संख्या जास्त आहे. लोकसभेचा सर्व खेळ हा मराठा-ओबीसी आणि दलित, मुस्लिम यांच्या मतांच्या गणितावर अवलंबून आहे. जातीय राजकारण वाढल्यामुळे मतदारसंघात संभ्रमाची स्थिती आहे. यामुळे कोणताही पक्षा रिस्क घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. जो जातीय समीकरण जुळवेल, तोच छत्रपती संभाजीनगरची जागा मिळवेल.

संभाजीनगरातील अंदाजे जातीय समीकरण

(यात टक्केवारी कमी-जास्त होऊ शकते)

जात - टक्केवारी

  • मराठा - २४ टक्के

  • मुस्लिम -१६ टक्के

  • बौद्ध समाज -१२ टक्के

  • ओबीसी -३८ टक्के

ब्राह्मण, जैन, शीख, मारवाडी-बिहारी, बंगाली, ख्रिश्‍चन, गुजराती व इतर १० टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com