esakal | महाशिवरात्रीला कोणत्या राशीनुसार कोणते फूल, द्रव्य वाहावे, जाणून घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

 News Information Mahashivratri Horoscope

कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते फूल आणि द्रव्य आज अर्पण करावे, याची खास माहिती वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत लक्ष्मणराव पांडव गुरुजी यांनी eSakal.com च्या वाचकांसाठी दिली.

महाशिवरात्रीला कोणत्या राशीनुसार कोणते फूल, द्रव्य वाहावे, जाणून घ्या...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन बेलफुलांचा अभिषेक, पूजा करतात. आपल्या राशीनुसार जर शिवचरणी फूल अर्पण केल्यास योग्य अभिषेक होते. त्यामुळेच कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते फूल आणि द्रव्य आज अर्पण करावे, याची खास माहिती वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत लक्ष्मणराव पांडव गुरुजी यांनी eSakal.com च्या वाचकांसाठी दिली.

मेष- मध, गूळ, उसाचा रस व लाल फुल!

वृषभ - कच्चे दूध, दही, पांढरे फुल!

मिथुन - हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र!

कर्क - कच्चे दूध, लोणी, बिल्वपत्र व पांढरे फुल!

सिंह - मध, गूळ, शुद्ध तूप व लाल पुष्प!

कन्या - हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र व निळी फुले!

तुळ - दूध, दही, रंगीत फुले!

वृश्चिक - मध, शुद्ध तूप, गूळ बिल्व पत्र व लाल फुल!

धनु - शुद्ध तूप, मध, बदाम, पिवळे फुल व पिवळे फळ!

मकर - मोहरीचे तेल, तिळाचे तेल, कच्चे दुध, जांभळे, निळे फुल!

कुंभ - कच्चे दुध, मोहरीचे तेल, तिळाचे तेल, निळे फुल!

मीन - उसाचा रस, मध, बदाम, बिल्वपत्र, पिवळे फुल व पिवळे फळ!

वाचा -  साप्ताहिक राशीभविष्य

महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच 24:28 ते 25:18  या कालावधीत शिवपूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात शिवाची पूजा करावी. त्यांना अभिषेक घालावा, बेलाची पानें अर्पण करावीत. कवठ या फळाचा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. 
- वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत लक्ष्मणराव पांडव गुरुजी 
 

loading image