Marathwada News | मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी; जाणून घ्या प्रमुख प्रकल्पांमधील जलसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 water project

मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी; जाणून घ्या प्रमुख प्रकल्पांमधील जलसाठा

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील सरासरी उपयुक्‍त पाणीसाठा ८२ टक्‍क्‍यांवर आला आहे. ११ मोठ्या धरणांमध्ये ७७ टक्के पाणीसाठा आहे. तर लघु प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा ६५ टक्‍क्‍यांवर आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली. विशेष म्हणजे गतवर्षी जानेवारीअखेर प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा हा ५३ टक्‍के एवढा होता.

हेही वाचा: 7,200 कर्मचाऱ्यांची पोलीस भरती गृहखातं स्वत:च करणार, घोटाळे टाळण्यासाठी निर्णय

मराठवाड्यातील ८७५ लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ८२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पांतील ८७ टक्‍के, मध्यम ७५ प्रकल्पांतील ८४ टक्‍के, ७४९ लघु प्रकल्पातील ६५ टक्‍के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील ७९ टक्‍के तर तेरणा मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ८९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश आहे. मध्यम ७५ प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पात ९० टक्‍के, जालन्यातील ७ प्रकल्पांत ८१ टक्‍के, बीडमधील १६ प्रकल्पांत ८७ टक्‍के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ८० टक्‍के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ८९ टक्‍के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ७६ टक्‍के, परभणीतील २ प्रकल्पांत ८० टक्‍के उपयुक्त पाणीसाठा आहे.

हेही वाचा: Budget 2022: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

गेल्यावर्षी २०२१ मध्ये २८ जानेवारीअखेर मराठवाड्यातील ७४९ लघु प्रकल्पांमध्ये ५३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. यंदा औरंगाबादमधील ९६ व परभणीतील २२ प्रकल्पांत ६८ टक्‍के, जालन्यातील ५७ व बीडमधील १२६ प्रकल्पांत ७१ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ७३ टक्‍के, उस्मानाबादमधील २०६ प्रकल्पांत ५६ टक्‍के, नांदेडमधील ८४ प्रकल्पांत ७० टक्‍के तर हिंगोलीतील २६ लघु प्रकल्पांत ५४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण लघु प्रकल्पांपैकी औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी एक तसेच उस्मानाबादमधील ३ लघु प्रकल्प मिळून ५ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. दुसरीकडे औरंगाबाद, लातूरमधील प्रत्येकी २, जालन्यातील एक, बीडमधील ४ व उस्मानाबादमधील १५ मिळून २६ लघु प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती मात्र त्यातल्या त्यात बरी आहे. ७५ पैकी ६४ प्रकल्पात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तर १० मध्यम प्रकल्पात ५० ते ७५ टक्‍क्‍यांदरम्यान उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

हेही वाचा: अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता ते रॅलीत धक्काबुक्की झाल्यानं ममतांना दुखापत; वाचा एका क्लिकवर

मोठ्या धरणाची स्थिती

 • प्रकल्प - जलसाठा टक्के

 • जायकवाडी - ८७

 • येलदरी - ८७

 • सिद्धेश्वर - ८६

 • माजलगाव - ८६

 • मांजरा - ९६

 • ऊर्ध्व पैनगंगा - ८८

 • निम्न तेरणा - ९५

 • निम्न मनार - ७६

 • विष्णुपुरी - ७९

 • निम्न दुधना - ९०

 • सीना कोळेगाव - ९७

Web Title: Marathwada Comforting News Learn About Water Storage Project

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top