esakal | Corona Updates: मराठवाड्यात वाढले ७०१ रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यात २८१ जण कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada And Aurangabad Corona Updates

रुग्णसंख्या ४९ हजार २९१ वर पोचली आहे. बरे झालेल्या आणखी ७१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४६ हजार ७२१ रुग्ण बरे झाले आहेत.

Corona Updates: मराठवाड्यात वाढले ७०१ रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यात २८१ जण कोरोनाबाधित

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठवाड्यात बुधवारी (ता.२४) दिवसभरात ७०१ कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यात औरंगाबादेत २८१, जालना १११, नांदेड ५५, परभणी ५५, हिंगोली २७, लातूर ९८, उस्मानाबाद १७, बीड जिल्ह्यातील ५७ जणांचा समावेश आहे.

वाचा - संजना जाधव देणार माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना टक्कर? सरपंच, उपसरपंचांच्या सत्काराला लावली हजेरी

रात्रीची संचारबंदी लागू करावी लागलेल्या औरंगाबादेत आजही दिवसभरात तब्बल २८१ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ४९ हजार २९१ वर पोचली आहे. बरे झालेल्या आणखी ७१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४६ हजार ७२१ रुग्ण बरे झाले आहेत. एक हजार ३२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार २५८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

वाचा -  रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ

शहरातील बाधित
परिसर (कंसात रुग्णसंख्या) : एन-३ सिडको (६), बीड बायपास (५), गुलमंडी (१), एन-९ (१), एन-५ (१), एन-७ (३), चंद्रनगर सिडको (१), श्रीकृष्ण नगर (१), हर्सूल (३), रामनगर (२), नारेगाव (१), नारळीबाग (२), सावरकर चौक (१), गारखेडा (३), हनुमाननगर (१), लक्ष्मीनगर (१), रामाकल्चरल हॉल (१), नंदनवन कॉलनी (५), एन- ६ (१), हडको (३), कासलीवाल विश्व (१), कैलास नगर (१), पुंडलिक नगर (२), ज्योती नगर (५), श्रेय नगर (१), शिवाजी नगर (२), जयभवानी नगर (१), एन-२ (३), वेदांत नगर (१), एन-१ सिडको (२), दशमेश नगर (१), देवळाई रोड परिसर (३), मुकुंदवाडी (१), एन -४ (२), गादियाविहार (२), पडेगाव (३), चिकलठाणा (१), एन -८ (१), शिवकॉलनी (३), चेतक घोडा परिसर (१), राधास्वामी कॉलनी (१), घाटी परिसर (२), जाधववाडी (२) सुराणा नगर (१), प्रतापनगर (२), संजयनगर (१), वसुंधरा कॉलनी (१), पदमपुरा (२), वेदांतनगर (२), सातारा परिसर (१), पिसादेवी (१), एसबी कॉलनी (१), निराला बाजार (३), खिंवसरा पार्क (१), समर्थ नगर राजतारा हौ. सो (२), सिंधी कॉलनी (२), सुयोग हा. सो. (१), शक्ती नगर, सीबीएस रोड (३), ईसीआय मोबिलिटी प्रा. लि. (२), अन्य (१५१) असे एकूण २६२ रुग्णांची भर पडली आहे.
ग्रामीण भागात बजाजनगर (५), राजतारा हौ. सो. (२), अन्य (१२). ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे.

वाचा - काम घेऊन आले अन् तिघे निघाले कोरोना पॉझिटिव्ह, ॲन्टीजेन चाचणीशिवाय चार कार्यालयांत 'नो एन्ट्री'

सात जणांचा मृत्यू
उपचारादरम्यान, औरंगाबादेत तीन, नांदेड, परभणी, लातूर, बीडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपुरा येथील ४७ वर्षीय पुरुष, शहरातील कलेक्टर ऑफिस कंपाऊंड परिसरातील ७४ वर्षीय पुरुष आणि देवगाव रंगारी (कन्नड) येथील ८० वर्षीय पुरुषाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.


-----
कोरोना मीटर (औरंगाबाद)
--
एकूण रुग्ण ४९२९१
बरे झालेले ४६७२१
उपचार सुरू १३१२
आतापर्यंत मृत्यू १२५८

Edited - Ganesh Pitekar

loading image