

Marathwada
sakal
छत्रपती संभाजीनगर : कायम दुष्काळाची छाया असलेल्या मराठवाड्यात यंदा पावसाने कहर केला होता. जून ते सप्टेंबर खरीप हंगामातील लाखो हेक्टरवरील उभी पिके तर गेलीच. परंतु, जमिनीही अक्षरशः खरडून गेल्या आणि दगडं उघडी पडल्याचे चित्र समोर आले होते. राज्य सरकारनेही पंचनामे करत दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा केली. पण, २४ ऑक्टोबर अखेर अद्यापही मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक शेतकरी मदतीविना वंचित असल्याचा आकडा समोर आला.