मराठवाड्याला मिळाले आणखी ७६३ कोटी

ढगफुटी-अतिवृष्टीने शेतीचे नुकसान
 crop damage
crop damageesakal
Updated on

औरंगाबाद : शासनाकडून अतिवृष्टी, पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित केला आहे. मराठवाड्यासाठी ७६३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी नुकताच वितरित केला.

ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ मध्ये मराठवाड्यात ढगफुटी व अतिवृष्टीने लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मराठवाड्यातील ४४ लाख ८७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) च्या दरापेक्षा अधिक निधी देण्याचे जाहीर केले होते.

त्यात वाढीव निधीसह जाहीर केलेल्या निधीपैकी दिवाळीदरम्यान ७५ टक्के एकूण २ हजार ८२१ रुपयांचा निधी मराठवाड्यात वाटप केले होते. तर उर्वरित २५ टक्के प्रमाणे ७६३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी मिळावा, यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे राज्य सरकारला नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनाने उर्वरित २५ टक्के म्हणजे ७६३ कोटी ७५ लाख १७ हजार रुपयांचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटपासाठी दिला आहे.याबाबतचे गेल्या बुधवारी (ता. १६ ) शासनादेश जारी झाले आहेत.

जिल्हानिहाय मंजूर निधी

जिल्हा मदत निधी (लाखात)

  • औरंगाबाद ९८८६.७३

  • जालना ९३२७.७४

  • परभणी ६७८१.०५

  • हिंगोली ५६१७.९२

  • नांदेड १३६६९.७१

  • बीड १४२३१.०४

  • लातूर ९७४९.६७

  • उस्मानाबाद ७१११.३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com