esakal | मराठवाडा : पंचनाम्यात वेळ घालण्यापेक्षा 25 हजाराची एकरी मदत करा- काळे । Rain
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण काळे

मराठवाडा : पंचनाम्यात वेळ घालण्यापेक्षा 25 हजाराची एकरी मदत करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता पंचनाम्यात वेळ घालण्यापेक्षा 25 हजाराची एकरी आर्थिक मदत करावी. यासंदर्भात मंत्री महोदय व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असल्याचे माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांनी सांगितले. फुलंब्री तालुक्यातील निमखेडा, शेवता, कविटखेडा, वानेगाव व पाथरी आदी भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हेही वाचा: सातारा : निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर झाली पोच

या भागाचीची पाहणी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी गुरुवारी (ता.एक) करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळेस ते बोलत होते. या पाहणी दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुनिता मारग, पिंपळगावचे सरपंच अंबादास गायके, सरपंच सदाशिव विटेकर, सुदाम मते यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी आमदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, फुलंब्री तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचे संकट शेतकऱ्यावर मोठे आले आहे. याचा सामना शेतकऱ्यांनी धैर्याने करावा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून लवकरच शासनामार्फत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणार आहे.

हेही वाचा: बँकेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून 25 हजार रुपये आर्थिक मदत शासनाने करावी यासंदर्भात मंत्री महोदयांसह जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही काळजी करू नका, काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे असा धीर माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे गिरीजा नदीवर शेवता याठिकाणी असलेले केटीवेअर फुटल्याने त्याला लागून असलेली जमीन पिकांसह तसेच काही विहिरी वाहून गेल्या आहेत. फुटलेले केटीवेअरची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा प्रशासनला त्वरित सुचना दिल्या जातील असे उपस्थित शेतकरी बांधवांना डॉ काळे यांनी ग्वाही दिली. याप्रसंगी सुभाष गायकवाड, मुकेश चव्हाण, विठ्ठल लुटे, आदींची उपस्थिती होती.

loading image
go to top