Marathwada Kunbi Certificates: तीन लाख १५ हजार कुणबी प्रमाणपत्रे वाटप; मराठवाड्यातील आकडा; सर्वाधिक बीड जिल्ह्यात मिळाले

3.15 Lakh Certificates Distributed Across Eight Districts: मराठवाड्यात ३१ ऑगस्ट २०२६पर्यंत ३ लाख १५ हजार ८४२ कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त झाले असून ३ लाख १५ हजार २३४ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.
Marathwada Kunbi Certificates

Marathwada Kunbi Certificates

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: कुणबी प्रमाणपत्रांसह मराठा आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता. त्यानुसार जरांगे हे २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत. त्यानुषंगाने विभागीय प्रशासनाकडून सातत्याने कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात आढावा घेतला जात आहे. गेल्या वर्षभरात म्हणजेच १ सप्टेंबर २०२५ ते १ सप्टेंबर २०२६ या एका वर्षात मराठवाड्यात ७६ हजार २१३ कुणबी प्रमाणपत्रे वाटप केल्याची माहिती विभागीय आयुक्तालय प्रशासनतर्फे देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com