Eknath Shinde : CM शिंदेंनी 15 मिनिटात मराठवाड्याला दाखवली मोठी स्वप्नं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज औरंगाबाद येथे मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम पार पडला.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde SAKAL

Marathwada Mukti Sangram Day : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज औरंगाबाद येथे मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम पार पडला. औरंगाबादमध्ये या दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याआधी या कार्यक्रमाच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलामुळे वाद निर्माण झाला होता. औरंगाबाद येथील कार्यक्रम केवळ 15 मिनिटांत आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैदराबाद येथील कार्यक्रमाला गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. पंधरा मिनिटांच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमात मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठावाड्याच्या विकासासाठी काही मोठी स्वप्न दाखवली आहेत.

CM Eknath Shinde
Vedanta Row : गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे; फडणवीस गरजले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी 136 कोटींची तरतुद करण्यात आल्याचे सांगितले. पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार याचीही घोषणा. जायकवाडी कालवा दुरुस्ती करण्याबरोबरच मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प हाती घेणार असल्येही शिंदेनी यावेळी सांगितले. याशिवाय जालना पाणीपुरवठा नूतनीकरण करण्यात येणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देण्यात येणार असून, लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद करण्याबरोबरच मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता देण्यात येणार असल्याच्या विविध घोषणा शिंदेनी मराठवाड्याच्या विकासासाठी केल्या आहेत.

CM Eknath Shinde
PM Modi Birthday : जेव्हा तीन मिनिटे उशिरा आल्याबद्दल मागितली होती माफी

म्हणून थोडक्यात आटोपला कार्यक्रम?

औरंगाबाद येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबादला रवाना झाले आहेत. हैदराबादमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांचा मिळून मुक्तिसंग्रामाचा एक संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता यावे, यासाठी औरंगाबादमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 9 वाजता ऐवजी सकाळी सात वाजता घेण्यात आला. यानंतर आता शिंगे गट आणि शिवसेनेमध्ये वादाला सुरूवात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com