

Monsoon Returns in Marathwada
esakal
छत्रपती संभाजीनगर : सध्या परतीच्या पावसाला सुरवात झाली असून, २० ते २४ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत परतीच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. यंदा जून, जुलै या दोन महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यातील चार दिवसांत पाऊस पडला होता. ऑगस्टमध्येही समाधानकारक पाऊस झाला नाही.