मराठवाडा साहित्य परिषदेचे २०२० चे ग्रंथपुरस्कार जाहीर हे आहेत मानकरी

मराठवाडा साहित्य परिषदेचे २०२० चे ग्रंथपुरस्कार जाहीर हे आहेत मानकरी

 
औरंगाबादः मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाड्ःमय प्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिलेले जातात. २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांतून पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेले २०२० चे ग्रंथपुरस्कार गुरुवार (ता.१८) मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाही केले. 

नरेंद्र मोहरीर वाड्ःमय पुरस्कारः मराठीतील कला, संस्कृती, इतिहास किंवा वाड्ःमयमीमांस या संबंधीच्या हा पुरस्कार दर दोन वर्षातून एकदा देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार डॉ. देवकर्ण मदन, औरंगाबाद यांच्या ‘मराठवाड्यातील साहित्य समीक्षा आणि संशोधन व डॉ. बाळु दुगडूमवार यांच्या ‘बाबा आमटेः व्यक्तीमत्व, कवित्व व कर्तृत्व’ या ग्रंथांना विभागून जाहीर करण्यात आले आहे. 

नरहर कुरुंदकर वाड्ःमय पुरस्कारः हा पुरस्कार फक्त मराठवाड्यातील कवी, लेखक, समीक्षक, अभ्यास यांच्या कोणत्याही वाड्ःमय प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथाला देण्यात येत असतो. या पुरस्कारासाठी नांदेडचे मनोज बोरगावकर यांच्या ‘नदीष्ट’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. 

प्राचार्य म. भि. चिटणीस वाड्ःमय पुरस्कारः हा पुरस्कार मराठीतील समीक्षा किंवा वैचारिक लेखनासाठी देण्यात येत असतो. यंदाच्या पुरस्कारासाठी चंद्रकांत वानखेडे नागपुर यांच्या ‘गांधी काम मरत नाही’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. 

कै. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कारः मराठीतील कविता लेखनासाठी दिला जाणारा हा पुरस्कार वर्षभरात प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहांतून निवड करुन एका उत्कृट कवितासंग्रहाला देण्यात येत असतो. या वर्षी या पुरस्कासाठी संदीप जगदाळे, पैठण यांच्या ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. 

बी रघुनाथ कथा-कांदबरी पुरस्कारः मराठीतील उत्कृष्ट कथासंग्रहाला किंवा उत्कृष्ट कादंबरीला हा पुरस्कार देण्यात असतो. या वर्षी सोपान हाळमकर, बीड यांच्या ‘वाढण’ या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. 

कुमार देशमुख नाट्यपुरस्कारः मराठीतील उत्कृष्ट नाटकाला किंवा नाट्यसमीक्षेला हा पुरस्कार देण्यात येत असतो. यंदा जगदीश कदम, नांदेड यांच्या ‘वडगाव लाईव्ह’ या नाटकाची आणि सुनंदा गोरे यांनी कुमारांसाठी लिहलेल्या ‘नवीन प्रतिक्षा’ या बालनाट्याची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार दोघांना विभागून देण्यात आला आहे. 

रा. ज. देशमुख स्मृतीपुरस्कारः मराठी पुस्तक व्यवहारात हयातभर लक्षणीय स्वरुपाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येत असतो. या पुरस्कारासाठी पुण्याच्या संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनीताराजे पवार यांची निवड करण्यात आली आहे. 

मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ही ग्रंथनिवड केली असून यामध्ये डॉ. सुरेश सावंत, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. संगीता मोरो, डॉ. संभाजी पाटील, डॉ. ज्ञानदेव राऊत हे सदस्य होते. यंदा पुरस्कार वितरण समारंभ न घेता पुरस्कार विजेत्यांना सन्मानचिह व पुरस्कार रकमेचे चेक पोस्टाने घरपोच पाविठण्यात येणार आहे असे ठाले पाटील यांनी कळविले आहे. यावेळी परिषदेचे कार्यवाहक डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे यांची उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com