Sambhaji Nagar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना झापले

जानेवारीअखेरीस पदवीचा निकाल : जिल्ह्यातील काम संथगतीने
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनग: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यासंदर्भात संबंधितांची बैठक घेतली.

या बैठकीत डॉ. गोसावी यांनी निकालाच्या बाबतीत हयगय नको, वेळेत लावा असा सज्जड दम भरला. उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचा त्यांनी बीड, धाराशिव व जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आढावा घेतला असता, नेमके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच काम संथ गतीने सुरु असल्याचे समोर आले. त्यावर कुलगुरूंनी परीक्षा संचालकांसह संबंधितांना धारेवर धरत याच महिन्याच्या अखेरीस निकाल लावण्याची तंबी दिली.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे सध्या काम सुरु आहे. यासाठी चार जिल्ह्यांत मिळून १७ मूल्यांकन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या संदर्भात डॉ. सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्राचार्यांची ऑनलाईन बैठक गेल्या आठवड्यात घेण्यात आली होती. त्याच वेळी कुलगुरूंनी निकालाच्या बाबतीत हयगय करु नका, असे सुनावले होते.

मात्र, मूल्यांकन केंद्रावर प्राध्यापकांना पाठवण्याचे प्राचार्यांना सांगितले होते. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विज्ञान व वाणिज्य शाखेतील उत्तरपत्रिका तपासण्याच्या बाकी आहेत. कुलगुरूंनी प्राचार्यांसह परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असता, हा प्रकार समोर आल्याने कुलगुरूंनी व मुल्यामापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी, उपकुलसचिवांना धारेवर धरत जाब विचारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com