

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: जून निम्मा झाला तरी मराठवाड्यात उन्हाच्या झळा आणि असह्य उकाडा कायम आहे. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. दुसरीकडे धरणांतील जलसाठा झपाट्याने घटत आहे. मराठवाड्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणांत सध्या सरासरी २८ जलसाठा शिल्लक आहे. दमदार पाऊस होईपर्यंत हा जलसाठा जपून वापरावा लागणार आहे. गतवर्षी मराठवाड्यात दमदार पाऊस झाला होता. पावसाळा लांबला होता. त्यामुळे सर्वच धरणे, प्रकल्प तुडुंब भरले होते.