
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागाने अखेर बोगस शिक्षक आणि बनावट आयडीधारक कर्मचाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. २०१२ पासून २०२५ पर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट मान्यता घेऊन शालार्थ प्रणालीत प्रवेश मिळवलेल्या आणि वर्षानुवर्षे शासनाकडून पगार घेणाऱ्या ‘लाडक्या’ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे.