Aurangabad Crime
sakal
छत्रपती संभाजीनगर : बहिणीसाठी पाठविलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने मेडिकल चालकाची हत्या करण्यात आला. ही घटना हर्सूल-कोलठाणवाडी रोडवर शुक्रवारी (ता.११) दुपारी घडली. शेख मोहम्मद फैसल अब्दुल कादर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी रेहान अमीन पटेल (२५, रा. करीमनगर, हर्सूल) आणि समीर रईस शेख या आरोपींना अटक केली आहे.