esakal | धक्कादायक! आईने स्वतःच्या मुलांनाच फेकले घरावरून; चिमुरड्याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

waluj accident

धक्कादायक! आईने स्वतःच्या मुलांनाच फेकले घरावरून; चिमुरड्याचा मृत्यू

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद): शेजाऱ्याबरोबर भांडण झाल्याने रागाच्या भरात दोन मजली इमारतीच्या गच्चीवर जाऊन एका 20 वर्षीय महिलेने दोन मुलांना खाली फेकले. त्यानंतर तिने स्वतः उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (ता.3) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत महिला व तिची दोन वर्षाची मुलगी असे गंभीर जखमी झाले असून 12 महिन्यांचा मुलगा मात्र या घटनेत ठार झाला. ही अत्यंत हृयद्रावक घटना वाळूज परिसरातील बजाजनगर येथे घडली.

हेही वाचा: चिंताजनक! उमरग्यात महिनाभरात दीड हजारांहून अधिक कोरोना रुग्ण

वाळूज परिसरातील बजाजनगरच्या जिजामाता हाऊसिंग सोसायटीत अनिता सतीश आतकर (वय 20) ही पती सतीश नागनाथ आतकर (27), मुलगी प्रतिक्षा आतकर (वय दोन वर्ष) व मुलगा सोहम आतकर (12 महीने) यांच्यासह किरायाच्या घरात राहते. आतकर हे पंढरपूर (जि. सोलापूर) येथील मळ रहिवासी आहे. तिचा पती सतीश आतकर हा कामगार असून तो सोमवारी (ता.3) रोजी कामाला गेला होता. तिचे शेजारी राहणाऱ्यांबरोबर भांडण झाल्याने अनिता ही प्रतीक्षा व सोहम या दोन्ही मुलांना घेऊन दोन मजली इमारतीच्या गच्चीवर गेली.

हेही वाचा: Remdesivir चोरी प्रकरण: अखेर भांडार प्रमुखांसह चौघांवर गुन्हे

प्रथम तिने 12 महिन्याच्या सोहमला खाली फेकले. त्यानंतर दोन वर्षीय प्रतिक्षाला फेकून स्वतः वरून वरुन उडी घेतली. या घटनेत सोहम हा जागीच गतप्राण झाला. तर प्रतिक्षा व अनिता या दोघेही गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुनावत, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा: World Press Freedom Day: जनहित हेच असावे माहिती प्रसारणाचे उद्दिष्ट

पोलिसांनी व सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन, अभिजीत गायकवाड, रवी शर्मा यांनी रुग्णवाहिकेतून सर्वांना घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून 12 महिन्याच्या सोहमला मयत घोषित केले. तर अनिता सतीश आतकर व प्रतिक्षा सतीश काटकर (दोन वर्षे) हे गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

loading image