Sambhaji Nagar : सूक्ष्म, लघू उद्योगांनी दिले हाताला काम ; देशात १५ कोटी तर महाराष्ट्रात १ कोटी ८२ लाख रोजगारनिर्मिती

देशात रोजगारनिर्मितीत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. १ जुलै २०२० ते १५ डिसेंबर २०२३ पर्यंत १५ कोटी ६७ लाख २० हजार ६८९ रोजगारनिर्मिती झाली.
सूक्ष्म, लघू उद्योग
सूक्ष्म, लघू उद्योगsakal

छत्रपती संभाजीनगर : देशात रोजगारनिर्मितीत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. १ जुलै २०२० ते १५ डिसेंबर २०२३ पर्यंत १५ कोटी ६७ लाख २० हजार ६८९ रोजगारनिर्मिती झाली. यात महाराष्ट्र आघाडीवर असून, १ कोटी ८२ लाख ४२ हजार ६७७ जणांना रोजगार मिळाला.

या खालोखाल तमिळनाडू १ कोटी ६८ लाख २१ हजार २०६, उत्तर प्रदेश १ कोटी ४९ लाख ८२ हजार ५०५, कर्नाटक १ कोटी १५ लाख ९१ हजार ४२२ जणांना रोजगार मिळाला. रोजगारासोबत देशाच्या जीडीपीमध्ये सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग महत्त्वाचे असून वर्ष २०१७-१८ मध्ये २९.६९ टक्के, २०१९-२० मध्ये ३०.४८ टक्के, २०२०-२१ मध्ये २७.२४ तर २०२१-२२ यावर्षी २९.१५ टक्के वाटा राहिला आहे.

काय आहेत व्यवसाय?

उत्पादन उद्योग असल्यास यंत्रसामग्रीसह कमाल भांडवली गुंतवणूक २५ लाख आणि सेवा उद्योग असल्यास विभिन्न उपकरणांमध्ये कमाल १० लाख भांडवली गुंतवणूक असणारे उद्योग सूक्ष्म उद्योगात मोडतात. ज्या उत्पादन उद्योगात यंत्रसामग्रीसह मालमत्तेमध्ये कमाल पाच कोटींची भांडवली गुंतवणूक असेल आणि ज्या सेवा उद्योगातील उपकरणांमध्ये दोन कोटी कमाल भांडवली गुंतवणूक असते, असे उद्योग लघू उद्योगात येतात. ज्या उत्पादन उद्योगाच्या यंत्रांवर कमाल भांडवली गुंतवणूक १० कोटी आहे तसेच ज्या सेवा उद्योगांच्या उपकरणांमधील गुंतवणूक कमाल पाच कोटी आहे, असे उद्योग हे मध्यम उद्योगांत मोडतात.

राज्यातील स्थिती

देशात ४ डिसेंबर २०२३ पर्यंत ३६ लाख ६९ हजार ३४५ सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग आहेत. यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. येथे ५ लाख ५८ हजार ७९९, ठाणे जिल्हा ४ लाख ३ हजार ३५२, मुंबई उपनगर २ लाख ८८ हजार ३८९, मुंबई २ लाख ५० हजार ४१९, नाशिक १ लाख ८१ हजार ४३, नागपूर १ लाख ६२ हजार ७९०, छत्रपती संभाजीनगर १ लाख ५१ हजार ६७१ तर कोल्हापूर येथे १ लाख ५० हजार ८२६ उद्योग आहेत.

लघू, मध्यम उद्योगांचा बेरोजगारी कमी करण्यात सिंहाचा वाटा आहे. जे कमी शिक्षित आहेत, अशा तरुणांनासुद्धा येथे रोजगार मिळतो. शिवाय अनेक लघू उद्योजकांनी आपली नोकरी सोडून उद्योग सुरू केलेले आहेत. त्यामुळे ते तरुणांना मोठी संधी देतात. राज्यात रोजगारनिर्मितीसाठी शासनाने लघू, मध्यम उद्योगांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

- नारायण पवार, माजी अध्यक्ष,

मसिआ, छत्रपती संभाजीनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com