esakal | एमआयएम म्हणते, झारखंडमध्ये रोप लावले़; फळ मिळायला वेळ लागेल
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

येथील तरुणांमध्ये एमआयएम आणि असदुद्दीन ओवेसी यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होते. त्यांचा आम्हाला निवडणूक प्रचारात प्रचंड प्रतिसादही मिळाला. पण पहिल्याच निवडणुकीत आपल्याला रिझल्ट मिळणार नाही, हे आम्हाला माहित होते.

एमआयएम म्हणते, झारखंडमध्ये रोप लावले़; फळ मिळायला वेळ लागेल

sakal_logo
By
जगदीश पानसरे

औरंगाबाद : झारखंड विधानसभा निवडणुकीत एमआयएमने उभे केलेले सर्व १४ उमेदवार पराभूत झाले. पण आम्ही पहिल्यांदाच उमेदवार दिले होते. सध्या आम्ही इथे रोपटे लावले आहे, त्याला फळ लागायला वेळ द्यावा लागेल, असे मत एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला. त्याची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच, तेथे हैदराबादच्या असदुद्दीन ओवेसी यांच्या मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन या पक्षानेही १४ उमेदवार उभे केले होते. या सर्वांचा या निवडणुकीत पराभव झाला. तिथे झारखंड मुक्ती मोर्चा, कॉंग्रेस आणि राजदचे आघाडी सरकार सत्तेवर आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने इथे एक जागा जिंकली. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी झारखंडमध्ये घेतलेल्या सभांना तेथील तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला मात्र त्याचे रुपांतर मतांमध्ये मात्र होऊ शकले नाही, असे इम्तियाज जलील यांनी मंगळवारी कबूल केले.  

ओवेसी यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण

''येथील तरुणांमध्ये एमआयएम आणि असदुद्दीन ओवेसी यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होते. त्यांचा आम्हाला निवडणूक प्रचारात प्रचंड प्रतिसादही मिळाला. पण पहिल्याच निवडणुकीत आपल्याला रिझल्ट मिळणार नाही, हे आम्हाला माहित होते. झारखंडमध्ये आमची यंत्रणा नव्हती, बिहार आणि उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही इथे लढलो. निवडणुकीआधी लोकांमध्ये एमआयएम आणि असदुद्दीन ओवेसी यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण असल्याचे आमच्या लक्षात आले होते. त्यांच्या जाहीर सभांना मिळालेल्या प्रतिसादावरून ते दिसूनही आले.'' 

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

''पण पहिल्याच निवडणुकीत आपल्याला यश मिळेल अशी अपेक्षा आम्ही केली नव्हती, आम्हाला ते कळालेही होते. तरी दोन-तीन मतदारसंघ असे होते जिथे आम्हाला थोडीफार जिंकण्याची आशा होती पण ते घडले नाही. परंतु आम्ही ना उमेद नक्कीच झालेलो नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास बिहारच्या किशनगंज मतदारसंघातून एमआयएमने तीनवेळा निवडणूक लढवली. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये अपयश आल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात आम्ही तिथे विजय मिळवला.''

हेही वाचलेच पाहिजे - ९५ वर्षांचा ‘तरुण’ देतोय व्यायामाचे धडे ! 

''झारखंडमध्ये प्रस्थापित पक्षांना पराभव स्वीकारावा लागला, त्या तुलनेत एमआयएम पक्ष नवखा होता, यंत्रणा नसतांना आम्हाला मिळालेला प्रतिसाद निश्‍चितच उर्जा देणारा होता. या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही झारखंडमध्ये एक रोपटे लावले आहे. भविष्यात त्याचे वृक्षात रुपांतर होऊन फळ यायंला वेळ लागेल आणि आमची तोपर्यंत वाट पाहण्याची तयारी आहे,'' असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.