Video : MIM खासदार इम्तियाज जलील यांच्यावर उधळले पैसे; कार्यकर्त्यांचा उत्साह अनावर

जिल्ह्यातल्या अतिवृष्टीनंतर त्यांनी ना परिस्थितीची पाहणी केली, ना शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली.
Imtiaz Jaleel
Imtiaz JaleelSakal

खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून औरंगाबादमध्ये सध्या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. अशाच एका कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर त्यांच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी पैसे उधळले आहेत. यावेळचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Imtiaz Jaleel
Accident News : नगर औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

औरंगाबादमधल्या आमखास मैदानावर एक कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जलील यांच्यावर पैसे उधळण्यात आले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण जलील यांच्यावर पैसे उधळल्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी खुलताबादमधल्या एका अशाच कार्यक्रमात जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैसे उधळले होते, तर एका लग्नातही हे घडलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून जलील यांच्याकडून आमखास मैदानावर वेगवेगळ्या स्पर्धा भरवण्यात येत आहेत. या कार्यक्रमांना विविध राजकीय नेतेही हजेरी लावत आहेत. काल याच मैदानावरच्या कव्वालीच्या कार्यक्रमात हे पैसे उधळण्यात आले. अतिवृष्टीमुळे जेव्हा जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान होत होतं, त्यावेळी जलील यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी केली नाही की बांधावर भेट दिली नाही, असं सांगत त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com