esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

अब्दुल सत्तार

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.दोन) जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार शनिवारी (ता. दोन ) सकाळी ९ वाजता गांधी जयंतीनिमित्त सिल्लोड येथे शिवसेना भवन येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करतील. आंबेडकर चौक येथे सकाळी ९.१५ वाजता मेडीकल शॉपचे उदघाटन करतील.

हेही वाचा: पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच

सकाळी ९.३० वाजता तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता माधवराव कळात्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त लिहाखेडी येथे आयोजित आरोग्य शिबिरात उपस्थिती व सकाळी ११.१५ वाजता लिहाखेडी येथील विविध विकास कामांचे उदघाटन. सकाळी ११.४५ वाजता मांडना येथील विविध विकास कामांचे उदघाटन . दुपारी १ वाजता फर्दापूर टी पाँईट येथे रक्तदान शिबिर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी. दुपारी २ वाजता वरखेडी तांडा डीपीचे उदघाटन व विविध विकास कामांचे उदघाटन. दुपारी २.३० वाजता सोयगाव येथे हेल्थ क्लबचे उद्घाटन व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करतील.

दुपारी ३ वाजता सोयगाव तहसिल कार्यालयात तालूक्यातील वरठाण व जरंडी येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मयताच्या वारसास धनादेश वाटप. दुपारी ३.३० वाजता सोयगाव तालूक्यातील गलवाडावाडी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी. सायंकाळी ४ वाजता जरंडी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी. सायंकाळी ४.३० वाजता धुळेकडे रवाना होतील.

loading image
go to top