esakal | मंत्री डॉ. भागवत कराड सहकाऱ्यांसोबत रमले जुन्या आठवणीत
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री डॉ. भागवत कराड

मंत्री डॉ. भागवत कराड सहकाऱ्यांसोबत रमले जुन्या आठवणीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान देणारे ‘भाजप’चे खासदार व आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झाले आहेत. शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे ह्यांच्या निवासस्थानी शनिवारी (ता. तीन) डॉ. कराड यांच्या वैद्यकीय व्यवसायातील जुन्या, जवळच्या सहकारी मित्रांनी कौतुक सोहळा साजरा केला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांसोबत जुन्या आठवणींनाही उजाळा देत आभारही मानले.

हेही वाचा: भीक मागणाऱ्या मुलांच्या पालकांचा शोध;पाहा व्हिडिओ

नेत्रतज्ज्ञ श्रीरंग देशपांडे यांच्या निवासस्थानी मंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासोबत ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. पी. एस. पाटील, शल्यचिकित्सक डॉ. अविनाश येळीकर, भूलशास्त्रतज्ज्ञ डॉ. अजित घायाळ, त्वचारोगतज्ञ डॉ. अशोक लोहालेकर, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. राजीव खेडकर आदी उपस्थित होते. ह्या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

हेही वाचा: सहा जणांनी काढले बनावट जात प्रमाणपत्र

‘‘आज मी जो काही आहे त्यात डॉ. पी. एस. पाटील ह्यांचा मोठा वाटा आहे. माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मी आज हे दिवस बघू शकलो. ते खऱ्या अर्थाने माझे व इथे जमलेल्या सगळ्यांचेच ‘मेंटॉर’ आहेत.’’ असे भावनिक उद्गगार त्यांनी काढले. येत्या दोन वर्षात औरंगाबाद शहराच्या विकासासाठी काय काय करता येईल ह्याची त्यांनी जुन्या मित्रांसोबत चर्चा केली. शहरासाठी भरीव योगदान देण्याचा निर्धार त्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केला.

loading image
go to top