esakal | सहा जणांनी काढले बनावट जात प्रमाणपत्र
sakal

बोलून बातमी शोधा

 fake certificate case

सहा जणांनी काढले बनावट जात प्रमाणपत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : बनावट बंजारा जात प्रमाणपत्र काढणाऱ्या सहा जणांविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात नायब तहसीलदार तुषार निकम यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता.तीन) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: परभणी : वैद्यकीय महाविद्यालयासाठी व्यापाऱ्यांचा बंद

नायब तहसीलदार निकम यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे, की उपविभागीय कार्यालयात बंजारा जातीचे बोगस प्रमाणपत्र काढल्याची तक्रार ता.दोन सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बंजारा विकास मिशनचे जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते सतीश राठोड व ता.तीन सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीचे मराठवाडा विभागीय सचिव अनिल ढवळे यांनी दिली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर बोगस बंजारा जात प्रमाणपत्र काढल्याचे पुढे आले. त्यामुळे बोगस बंजारा जात प्रमाणपत्र काढणाऱ्या विशाल हिम्मत मोरे, किशोर वेंकट भिडे, अमित आशिष मेडकर, बाबूलाल मोफतलाल मोरे (सर्व रा. रेवगाव, ता.जि. जालना), ई सेवा केंद्र चालक महेश गुलाब राऊत (रा.कुंबेफळ, ता.जि. जालना), अशोक सुभाष गायकवाड (रा.रेवगाव, ता.जि. जालना) यांच्या विरोधात कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: मिरवणूक न काढता जागेवरच करणार ‘श्रीं’चे विसर्जन

कारवाई व्हावी : आमदार राठोड

मंठा : जालना उपविभागाच्या वतीने बंजारा जातीचे खोटे आणि बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचे समोर येत आहे. अशा प्रकारचे बनावट बोगस प्रमाणपत्र घेऊन त्याचा लाभ घेणाऱ्यावर किंवा पदोन्नती मिळवणाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार राजेश राठोड यांनी केली आहे.

याबाबत आमदार राठोड यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याशी संपर्क साधला, याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून त्याच्या आधारे आर्थिक लाभ घेणे किंवा पदोन्नती मिळवणे ही बाब अतिशय गंभीर असून, याबाबत कडक कारवाई झाली पाहिजे. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे कुणी नोकरी किंवा आर्थिक लाभ घेतला असेल तर त्याची रिकव्हरी करून त्या व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे, यासाठी मी शासन दरबारी आग्रही असणार आहे. असे आमदार राठोड यांनी सांगितले.

loading image
go to top