Sillod : सिल्लोड-सोयगाव बाजार समितीवर मंत्री सत्तारांची सत्ता ; जय श्रीराम शेतकरी पॅनेलचे सर्व १८ उमेदवार विजयी

सिल्लोड-सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा बाजार समितीची सत्ता एकहाती ताब्यात घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वातील जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनेलने भाजप पुरस्कृत श्री सिद्धेश्वर-मुर्डेश्वर शेतकरी परिवर्तन सहकार विकास पॅनलला व्हाइट वॉश देत सर्व अठरा जागांवर विजय मिळविला आहे.
abdul sattar
abdul sattarsakal

सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा बाजार समितीची सत्ता एकहाती ताब्यात घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वातील जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनेलने भाजप पुरस्कृत श्री सिद्धेश्वर-मुर्डेश्वर शेतकरी परिवर्तन सहकार विकास पॅनलला व्हाइट वॉश देत सर्व अठरा जागांवर विजय मिळविला आहे.

रविवारी झालेल्या मतदानाची टक्केवारी बघता निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीस शहरातील शेवंताबाई मंगल कार्यालयात सुरूवात झाली. यावेळी सर्वात पहिला निकाल हमाल व तोलारी मतदारसंघाचा घोषित झाला. यामध्ये श्री सत्तार यांच्या पॅनेलच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने विजय मिळविला. त्यानंतर मात्र, सहकारी संस्था मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदार संघ, व्यापारी मतदार संघाची मतमोजणी संथ गतीने सुरू होती.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास चित्र स्पष्ट होऊन सत्तारांच्या नेतृत्वातील पॅनेलने जोरदार मुसंडी मारीत सर्वच्या सर्व अठरा जागांवर विजय संपादन केल्यामुळे बाजार समितीची एकहाती सत्ता पुन्हा मंत्री अब्दुल सत्तार यांनी काबीज केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप जैस्वाल यांनी निकाल घोषित केला. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शेषराव उदार यांनी बंदोबस्त ठेवला होता. निकाल घोषित होताच मंत्री अब्दुल सत्तार समर्थकांसह मतमोजणीच्या स्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. विजयी उमेदवारांसह मंत्री सत्तार यांची मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

abdul sattar
Sillod News : सिल्लोड-सोयगाव बाजार समितीवर मंत्री अब्दुल सत्तारांचे एकहाती वर्चस्व; सर्व १८ उमेदवार विजयी

निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण

निवडणूक निकालाची घोषणा होताच मतमोजणी केंद्राच्या बाहेर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी गुलालाची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार यांची उपस्थिती होती.

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचा विजय हा कार्यकर्त्यांचा तसेच मतदारांच्या विश्वासाचा विजय आहे. निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवून देणाऱ्या मतदारांचे आभार. बाजार समिती स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा बाजार समितीवर एकहाती सत्ता मतदारांनी दिली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळ त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतील. बाजार समितीच्या माध्यमातून गाव तेथे गोदाम तसेच बनकिन्होळा येथे कोल्ड स्टोरेज, आमठाणा, सावळदबारा व बनोटी येथे लवकरच उपबाजार उभारणार.

अब्दुल सत्तार, अल्पसंख्याक तथा पणनमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com