- टीम सकाळ
छत्रपती संभाजीनगर - शहराची २,७४० कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना देशातील सर्वांत मोठी असल्याचा गवगवा केला जात आहे. तत्कालीन मंत्री अतुल सावे यांनी योजनेचे काम गतीने व्हावे, यासाठी शासनाकडे अट्टाहास करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) निवड केली खरी; पण एवढ्या मोठ्या योजनेवर केवळ आठ अधिकारी काम करत आहेत.