esakal | विधायक : व्हॉटसअॅपवर भरतेय लॉकडाऊन पाठशाळा, मनसेचा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

  MNS Initiative Lockdown School On WhatsApp Aurangabad News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कर्म फाऊंडेशनतर्फे ‘लॉकडाऊन पाठशाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पाचवी ते दहावीतील मराठी, सेमी इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

विधायक : व्हॉटसअॅपवर भरतेय लॉकडाऊन पाठशाळा, मनसेचा उपक्रम

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : कोरोनामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय बंद झाले तर, त्या आहेत शाळा. परीक्षा नाही, थेट सुट्टी तीही पावणेदोन महिन्यांपासून. पुन्हा प्रवेशाचे दिवस सुरु आहेत. यामुळे पालकांना मुलांच्या भवितव्‍याची चिंता सतावत आहे. यावर मात करत औरंगाबादेत सुरु झालेली ‘लॉकडाऊन पाठशाळा’ राज्यभरातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहे. तसेच सहभागी होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कर्म फाऊंडेशनतर्फे ‘लॉकडाऊन पाठशाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पाचवी ते दहावीतील मराठी, सेमी इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. लॉकडाऊन पाठशाळा उपक्रमांतर्गत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शिकता येत आहे. अभ्यासक्रमातील ‘पाठ्यपुस्तक’ आणि प्रत्येक धड्याचा ‘व्हिडिओ’ विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहे. तसेच एका हेल्पलाइन क्रमांकाद्वारे विद्यार्थ्यांना कोणतीही शंका तज्ज्ञ शिक्षकांना विचारता येण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. 

VIDEO : बाबागाडी, लोटगाडीतून लेकरं चालली मध्यप्रदेशला, तेही औरंगाबादेतून

अशी सुरुय पाठशाळा 
‘लॉकडाऊन पाठशाळा’साठी व्हिडिओ वेगवेगळ्या सोर्सेसकडून मिळवले जात आहेत. तर, काही स्वत:च तयार केले जात आहेत. तयार करण्यात आलेले वेळापत्रक दर सोमवारी ग्रुपवर टाकली जात आहे. त्यानंतर अभ्यासक्रमाच्या पीडीएफ टाकले जातात. विद्यार्थी वेळापत्रकानुसार व्हिडिओ डाऊनलोड करुन अभ्यास करत आहेत. 

हा उपक्रम मोफतच 
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोफत आहे. विविध जिल्ह्यातून विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. आतापर्यंत जवळपास ४ हजार ५०० विद्यार्थी याचा रोज लाभ घेत आहेत. ही संख्या दर आठवड्याला वाढतच चालली आहे. मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तयार केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. 

असे व्हाल सहभागी.. 
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना रोज आपल्या इयत्तेनुसार व्हिडिओ डाऊनलोड करूनअभ्यास चालू ठेवता येईल. ज्यांना ग्रूप लिंकद्वारे जॉईन करता आले नाही, त्यांनी 8788687680 या व्हॉटसॲप नंबरवर ADD ME असा संदेश पाठवावा. त्यानंतर ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी मित्रांची प्रगती थांबू नये, याहेतूने उपक्रम सुरू केला आहे. राज्यभरातून प्रतिसाद मिळत असून यापुढेही सेवा मोफतच असेल. पंधरा दिवसात सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठीही याचा लाभ मिळू शकेल. 
- बिपीन नाईक, जिल्हा संघटक, मनसे, औरंगाबाद.